smart school
online सराव चाचणी क्र.3
online सराव चाचणी क्र.3
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी बु.आयोजित स्पर्धा परीक्षा सन २०१९-२०
विषय :- म्हणी
एक घाव दोन तुकडे . या म्हणीचा अर्थ सांगा .
नसते लचांड पाठीमागे लावून घेणे
चर्चा न करता झटपट निकाल लावणे .
एकाच घावत दोन भाग करणे.
मिळालेल्या संधीचा पटकन फायदा करून घेणे.
एका हाताने टाळी वाजत नाही. या म्हणीचा अर्थ सांगा .
सगळेच दोषी असतात
दोघांच्या भांडणात एकट्याला दोष देता येत नाही.
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा सहभाग असतो.
दोघांच्या भांडणात एकट्यालाच दोष देणे.
कुडास कान , ठेवी ध्यान . या म्हणीचा अर्थ सांगा .
नेहमी सावधगिरीने बोलावे
मागून येवून वरचड होणे.
एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.
साहसाचे कार्य करायचे ,तर संकटाची भीतीबाळगू नये.
गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. या म्हणीचा अर्थ सांगा .
खूप प्रवास केल्यास थोरपणा मिळतो.
एकाचे कर्तुत्व असणे,पण ते दुसऱ्याच्या नावे गाजने.
मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचा देखील फायदा होणे.
मोठ्यांनाही लहानांची गरज असते.
कानामागून आली आणि तिखट झाली. या म्हणीचा अर्थ सांगा .
जो वाईट काम करतो ,त्याला मनात धास्ती वाटते.
बलवान मनुष्य इतरांवर सत्ता गाजवतो.
श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे.
विस्मरणामुळे काही वेळा फार मोठा तोटा होतो.
दुष्परिणामांचा विचार न करता बोलणे. या अर्थाची म्हण ओळखा.
दिव्याखाली अंधार.
उंदराला मांजर साक्ष
उचलली जीभ लावली टाळ्याला
दुष्काळात तेरावा महिना
सहजासहजी समोर दिसलेल्यांना मनात नसतानाही नमस्कार करणे. या अर्थाची म्हण ओळखा.
दृष्टीआड सृष्टी
देखल्या देवा दंडवत
मनी वसे ते स्वप्नी दिसे.
वारा पाहून पाठ द्यावी.
गरजेपुरत्या गोष्टी घेवून फिरता येणे. या अर्थाची म्हण ओळखा.
गोगलगाय अन पोटात पाय.
घर ना दार देवळी बिऱ्हाड
विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर
शीर सलामत तो पगडी पचास
अचानक एखादी गोष्टघडली , तर एखाद्याला पाहिजे ते मिळते. या अर्थाची म्हण ओळखा.
आयत्या बिळात नागोबा.
लाथ मारीन तेथे पाणी काढीन.
धीर धरील तो खीर खाईल.
शिंक्याचे तुटले आणि बोक्याचे फावले.
एखाद्या गौण वस्तूला मुख्य वस्तूपेक्षा अधिक महत्व प्राप्त होणे. या अर्थाची म्हण ओळखा.
खाईन तर तुपाशी,नाहीतर उपाशी.
देश तसा वेश
नाकापेक्षा मोती जड.
थोराघरचे श्वान त्याला सर्व देई मान .
No comments:
Post a Comment
Home
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment